खरे तर हे जे बॉम्बस्फोट जेवढे त्यामधल्या मृत्युमुखी आणि जखमींचे जीवन उध्वस्त करतात , तेवढेच इतर सामान्य जनतेच्या मनाला तडा देतात . तुम्ही किती ही म्हणा हो " मुंबई स्पिरीट " , " आम्ही अशा भ्याड कृत्यांना घाबरणार नाही " , कुठे न कुठे तरी त्याची मनात धास्ती बसलेलीच असतेच .. आणि काही प्रमाणात दहशतवाद्यांचा हल्ला सफल झालेला असतोच !
या अशा बॉम्बस्फोटानंतर घडणाऱ्या काही "घटना" :
१. अफवांना "उधान"
कालच्या बॉम्बस्फोटानंतर सुद्धा , ३ नाही ५ बॉम्बस्फोट झाले .. अजून ३ बॉम्ब्स आहेत ( ह्यांना कुठून समजले हे ? उलट ह्यांची चौकशी करा आधी ! ) या अफवामुळे उगाचच एक भीतीचे सावट पसरले जाते , आणि अशा वेळी विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा मनात संभ्रम निर्माण होतोच ..
२. इलेक्ट्रोनिक मेडिया ची "ब्रेंकिंग न्यूज" साठी चालेली धडपड
खरे तर टी.आर.पी. साठी चालेली ही धडपड बघवत नाही .. आहो कोणी पहिली बातमी दिली ह्यापेक्षा कोणी खरी बातमी दिली हे जास्त महत्वाचे नाही का ? प्रत्येक चानेल वेगळी माहित देत असतो .. अश्या वेळी विश्वासहर्तेच प्रश्न निर्माण होतोच की ?
३. विरोधकांचा सत्ताधार्यावर "आरोप-प्रत्यारोप"
ही तर राजकारण्यांना "पर्वणीच" असते .. "राज्य कसे अस्थिर आहे ? आणि ह्याला खरा जबाबदार कोण ?" ह्याची आपली पुन्हा एकदा "उजळणी" होते ..
४. गृहमंत्र्यांना "राजीनाम्याची" मागणी
कसे आहे न " ऐसे बडे बडे शहरो में ऐसी ऐसी छोटी छोटी बाते होती ही राहती है " !!! खरे तर त्या गृहमंत्र्यांचे "दुर्देव " अजून काय म्हणणार ...
५ . हल्ल्याची "जबाबदारी" कोणाची ?
लष्कर ए तोयबा , इंडिअन मुजाहिदीन , ही "मंडळी" लगेच "जबाबदारी" घेतात .. काही दिवसात समजते की दाउद च्या हस्तकांचा ही हात होता ?
६. १३ आणि ८
पुन्हा एकदा १३ तारीख आणि ८ अंक मुंबई ला कसे धोकादायक हे दाखवले जाते ? ( काय संबंध ह्याचा ? ) अहो इतर तारखांना कधी झाले नाहीयेत का बॉम्बस्फोट आणि पुढे पण याच तारखांना होतील का ???
७. पुन्हा एकदा मुंबई स्पिरीट चे "कौतुक"
सर्वत्र मुंबई स्पिरीट चे "कौतुक" होत असते ! कुठे तरी मृताना श्रद्धांजली दिली जाते .. मदतीची आश्वासने दिली जातात .. आणि दुसऱ्या दिवशी मुंबई परत रुळावर आलेली असते ..
पण ..
पण .. आता मात्र असह्य झाले आहे .. किती दिवस आम्ही हे सहन करायचे ? किती दिवस मुंबई ने सहन करायचे ? ह्याला कोण जबाबदार आहे ? राजकारणी की आपण ? आपण एवढे दुबळे झालो आहोत का की हातावर हात ठेऊन फक्त बघ्याची भूमिका घ्यायची ? मुंबई मधल्या माणसाच्या जगण्याला काही किमत आहे की नाही ? आर्थिक राजधानी मध्ये अशी गत ... श्या ..दुर्देव च आहे मुंबई चे .. आणि किती दिवस चालणार हे ? नसरुद्दिन शहाचा वेन्सडे मधला डायलॉग आठवतो " इस आम जनता में बहोत गुस्सा है , इसे आजमा मत लो .. " हे डायलॉग सुद्धा आता गुळगुळीत झाले आहेत ..
असे अनेक लेख लिहिले गेले असतील आणि लिहिले जातील मुंबई बॉम्बस्फोटावर .. पण पुढचा बॉम्बस्फोट होई पर्यंत सगळेच प्रश्न अनु-उत्तरीत असतातच .. दुर्देव च आहे मुंबई चे आणि मुंबईकरांचे ..आजून काय ?