Saturday, November 30, 2013

Farewell of Cricket !

"There was a lot of fuss about Sachin's 200th and final test match, mixed response from public. I personally feel the man who played for the nation for 24 years and being role model for generations certainly deserves that.

As always, he replied critics in his style - with display of vintage Tendulkar - cover drives, straight drive, leg glance, sweep in his last innings of 74(118). He certainly ended his carrier on a high note. That was a special knock for all of us. We wanted him to score yet another century ( Even in his last innings we had some expectations from him!) but Harsha Bhogle rightly said, 'a hundred 100s has such a lovely ring to it. try saying one hundred and one hundreds'

His farewell speech showed us how humble and down to earth he is, even after achieving everything in cricket anyone can think of. His speech touched billion hearts because it was coming straight off from Sachin's heart. He has always inspired and motivated us, now this speech has taken that to a different level.

We; all cricket lovers; have seen farewell of Ganguly, Kumble, Lara, Waugh, Warne, Murali, Ponting and many more. Due respect to all these legends, that last walk to the pitch by himself , yet again showed us that why Sachin is different. He is in his own league. That was, his way of thanking and respecting the 22 yards who made Sachin Ramesh Tendulkar - God of Cricket !"

Thank you Sachin !

Mihir Adivarekar
#SRTfanforever

Thursday, July 14, 2011

किती दिवस मुंबई ने सहन करायचे ?

काल मुंबई पुन्हा एकदा हादरली .. झवेरी बाजार , ओपेरा हाउस , कबुतरखाना इथे झालेले बॉम्बस्फोट "नेहमीप्रमाणे" मन सुन्न करणारे होते.. हो "नेहमीप्रमाणे" च .. दर २ ते ३ वर्षांनी मुंबई ला " हादरवले " जातेच की ! अहो आता ह्याची मुंबईकरांच काय , पण सगळ्या जगाला सवय झाली आहे .. 
खरे तर हे जे बॉम्बस्फोट जेवढे त्यामधल्या  मृत्युमुखी आणि जखमींचे जीवन उध्वस्त करतात , तेवढेच इतर सामान्य जनतेच्या मनाला तडा देतात . तुम्ही किती ही म्हणा हो " मुंबई स्पिरीट " , " आम्ही अशा भ्याड कृत्यांना घाबरणार नाही " , कुठे न कुठे तरी त्याची मनात धास्ती बसलेलीच असतेच  .. आणि काही प्रमाणात दहशतवाद्यांचा हल्ला सफल झालेला असतोच !

या अशा बॉम्बस्फोटानंतर घडणाऱ्या काही "घटना" :

१. अफवांना "उधान" 
कालच्या बॉम्बस्फोटानंतर सुद्धा , ३ नाही ५ बॉम्बस्फोट झाले .. अजून ३ बॉम्ब्स आहेत ( ह्यांना कुठून समजले हे ? उलट ह्यांची चौकशी करा आधी ! ) या अफवामुळे उगाचच एक भीतीचे  सावट पसरले जाते , आणि अशा वेळी विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा मनात संभ्रम निर्माण होतोच ..

२. इलेक्ट्रोनिक मेडिया ची "ब्रेंकिंग न्यूज" साठी चालेली धडपड 
खरे तर टी.आर.पी. साठी चालेली ही धडपड बघवत नाही .. आहो कोणी पहिली बातमी दिली ह्यापेक्षा कोणी खरी बातमी दिली हे जास्त महत्वाचे  नाही का ? प्रत्येक चानेल वेगळी माहित देत असतो .. अश्या वेळी विश्वासहर्तेच प्रश्न निर्माण होतोच की ?

३. विरोधकांचा सत्ताधार्यावर "आरोप-प्रत्यारोप"   
ही तर राजकारण्यांना "पर्वणीच" असते .. "राज्य कसे अस्थिर आहे ? आणि ह्याला खरा जबाबदार कोण ?" ह्याची आपली पुन्हा एकदा "उजळणी" होते ..

४. गृहमंत्र्यांना "राजीनाम्याची" मागणी 
 कसे आहे न  " ऐसे बडे बडे शहरो में ऐसी ऐसी छोटी छोटी बाते होती ही राहती है " !!! खरे तर त्या गृहमंत्र्यांचे "दुर्देव " अजून काय म्हणणार  ... 

५ . हल्ल्याची "जबाबदारी" कोणाची ?
 लष्कर ए तोयबा , इंडिअन मुजाहिदीन , ही "मंडळी" लगेच "जबाबदारी" घेतात .. काही दिवसात समजते की दाउद च्या हस्तकांचा ही हात होता ?

६. १३ आणि ८ 
 पुन्हा एकदा १३ तारीख आणि ८ अंक मुंबई ला कसे धोकादायक हे दाखवले जाते ? ( काय संबंध ह्याचा ? )   अहो इतर तारखांना कधी झाले नाहीयेत का बॉम्बस्फोट आणि पुढे पण याच तारखांना होतील का ???

७. पुन्हा एकदा मुंबई स्पिरीट चे "कौतुक" 
 सर्वत्र  मुंबई स्पिरीट चे "कौतुक"  होत असते ! कुठे तरी मृताना श्रद्धांजली दिली जाते .. मदतीची आश्वासने दिली जातात .. आणि दुसऱ्या दिवशी मुंबई परत रुळावर आलेली असते .. 

पण .. 
पण .. आता मात्र असह्य झाले आहे .. किती दिवस आम्ही हे सहन करायचे ? किती दिवस मुंबई ने सहन करायचे ? ह्याला कोण जबाबदार आहे ? राजकारणी की आपण ? आपण एवढे दुबळे झालो आहोत का की हातावर हात ठेऊन फक्त बघ्याची भूमिका घ्यायची ? मुंबई मधल्या माणसाच्या जगण्याला काही किमत आहे की नाही ? आर्थिक राजधानी मध्ये अशी गत ... श्या ..दुर्देव च आहे मुंबई चे .. आणि किती दिवस चालणार हे ? नसरुद्दिन शहाचा वेन्सडे मधला डायलॉग आठवतो " इस आम जनता में बहोत गुस्सा है , इसे आजमा मत लो .. "  हे डायलॉग सुद्धा आता गुळगुळीत झाले आहेत ..

असे अनेक लेख लिहिले गेले असतील आणि लिहिले जातील मुंबई बॉम्बस्फोटावर .. पण पुढचा बॉम्बस्फोट होई पर्यंत सगळेच प्रश्न अनु-उत्तरीत असतातच .. दुर्देव च आहे मुंबई चे आणि मुंबईकरांचे ..आजून काय ?
 

Sunday, February 27, 2011

Its like Dream come true ...


१३ मे २०१० - रात्रीचे ८:३० झाले होते,
बाबा: मिहिर, जरा १ किलो बाकरवडी आणि १ किलो आंबा बर्फी घेयून ये रे चितळे मधून .आपल्याला जरा उद्या मुंबईमधल्या एका site  वर जायचे आहे. तू पण ये (?)
नुकत्याच Vivas संपल्यामुळे University Written Exam च्या अभ्यासाला तशीशी सुरवात होणार नव्हतीच .. Indian Team च्या disastrous performance ने world cup  बघायची इच्छा केव्हाच संपली होती .. आणि त्यात BE च्या Last Sem ची Exam, Mumbai Indians  ची last match , यामुळे मनावर थोडी मरगळ आलीच होती..थोडा तेवढाच change म्हणून मी ही बाबांना म्हणलो " ठीक आहे येतो.."

१४मे २०१० 
          सकाळी ६:३० वाजता घरातून मुंबईला जाण्यासाठी निघालो . बऱ्याच दिवसांनी एवढ्या पहाटे उठायला लागल्यामुळे मी गाडीमध्ये पेंगतच होतो जेव्हा जाग आली तेव्हा लोणावळा cross केले होते .. त्यात श्री ( श्रीनिवास कस्तुरे ) चा SMS आला..Dhoni to be sacked as a Captain (अफवा!) त्याला as usual SMS करून माझा संताप दर्शवत होतो..पुढे खालापुरचा नाका आला तेव्हा विश्वनाथ काकांनी ( बाबांच्या office मधील त्यांचे सहकारी ) मुंबई कडेचा रस्ता सोडून पेण चा रस्ता पकडला .. मला वाटले काही दुसरे काम आहे म्हणून चालो  असू तिकडे.. मी पण फारसे लक्ष घातले नाही .. १५-२० मिनिटानंतर जस जसे अलिबाग च्या पाट्या दिसायला लागल्या तशी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली ..मी बाबांना विचारले ," बाबा आपण नक्की कुठे चालो आहोत ?" बाबांनी माझ्याकडे बघितले आणि हसून म्हणाले ," 'सचिन' येतोय आज अलिबागच्या Site वर ...!!!"
खर सांगायचे तर ज्या काही भावना माझ्या मनात आल्या त्याचे वर्णन केवळ अशक्य आहे... अशक्य ! मी आता हे लिहिताना देखील त्या भावना माझ्या मनात येत आहेत .. पोटात गोळा , अंगावर घामाच्या धारा , शहारा, अंगावर काटा  ,.. या सगळ्या पलीकडच्या भावना होत्या त्या ..
मी: काय्य्यय्य्य ? आहो बाबा तुम्ही काय बोलताय .... सचिन येतोय ... ?? कसे काय ? कधी ? कसे शक्य आहे ? पण .. नक्की का ? अहो मला काल आधी सांगितले असते तर त्याचे Cuttings, photos articles घेऊन आलो असतो ..
बाबा: Site Visit साठी येत आहे ..सगळे Bag मध्ये घेतले आहे .. Camera सुद्धा घेतला आहे .. 
मी शांत .. शांत कसला गार पडलो होतो मी  .. म्हणजे काय चाले आहे काही कळतच नव्हते .. मनात नुसते विचार आणि विचार फक्त ..
मी: आहो बाबा हे काय ? असे अचानक ? अहो काय चाले आहे तुमचे ? मला काही सांगितले असते ना .. आहो काय हे .. तिकडे मित्रांना कळले ना अहो खून करतील हो माझा.. !! मला एक phone करू द्या कुठल्या पण गाड्या काढून , जसे असतील तसे इकडे येतील ते सगळे .. तो चिक्या ( चैतन्य भिसे ) तर माझा जीव घेईल हो .. तो त्याच्या Activa वर पण इकडे यायला मागे पुढे बघणार नाही....
बाबा: ( हसतच) अरे मी समजू शकतो रे .. पण आगदीच नाईलाज आहे ..  office मध्ये सुद्धा कोणाला सांगितले नाहीये .. जास्त कोणाला घेऊन येऊ नका असे सांगितल्याने काहीच करू शकत नाही .. 
बाबांचा लाडके  सुनील गावस्कर असले तरी सचिन हा weak point होता .. त्यांच्या बोलण्यामधून कळत होते.. मी ही निरुत्तर झालो होतो..त्यानंतरचा जो प्रवास होता .. पेण ते सचिन चे farm house .. त्या प्रवासामध्ये नुसते विचारचक्र चालू होते .. डोक्यात ज्या काही innings सुरु झाल्या होत्या त्याच्या .. कमाल !!! ( please पण तुम्ही समजून घ्या उगाच खरडायचे म्हणून नाही .. पण खरचं .. ) England Tour , Sharjah , 2003 World Cup , Sydney Century, 175 Vs Aussies , 200* , Moin Khan's wicket , Adelaide test Steve Waugh's Wicket , Hero Cup Last Over , Recently IPL .. बस बस .. हे ज्या एका ( देव) माणसाने केले त्याला भेटायची संधी .. सचिन रमेश तेंडूलकर !!! याला भेटायची संधी ... 
खरे सांगायचे तर .. मनात खूप इच्छा होती की .. US ला जायच्या आधी एकदा तरी भेट व्हावी सचिनची .. तशी संधी आधी आली पण होती .. IPL ची 1st match Mumbai Indians Vs Rajasthan Royals .. बघायला गेलो होतो .. सोनिया डबीर (Member of Indian Women Cricket Team ) आणि मिलिंद गोरे ( MCA Scorer ) यांच्या मुळे सचिन ची press conference attend करता आली होती .. Personally” भेटायची संधी अगदीच हुकली होती ..  वाटले आता परत "दर्शन" अवघडच ! पण आज आयुष्याच सार्थक होणार होते  . ज्याची प्रत्येक Cricketer ने इच्छा बाळगली असते ती इच्छा पूर्ण होणार होती आज .. ज्याने Cricket खेळण्याची इर्षा निर्माण केली त्या जगत्जेत्याला त्या master blaster त्या Legend ला भेटणार होतो आज ...
आम्ही ९:३० ला पोहचलो तिथे .. सचिनच्या farm house चे काय काय काम झाले आहे हे बघत  होतो... ( खर सांगायचे तर काही कळत नव्हत .. फक्त “त्या” एका “देव” माणसाची वाट बघत बसलो होतो मी .)
     आणि तो क्षण आला .. एक Innova आणि एक Audi येताना दिसली..( परत मनामध्ये मगाच्याच भावना .. ) आम्ही जिथे उभे होतो त्याच्या काही अंतरावरच त्या गाड्या येऊन थांबल्या. मागच्या Seat वरून अंजली तेंडूलकर उतरल्या. आणि शेजारच्या seat वरून सचिन रमेश तेंडूलकर उतरले.. Black jeans , Maroon T Shirt , Navy Blue color Adidas “ ST” Cap..
     इथून पुढे मात्र मी त्याची प्रत्येक pose “ catch” करण्यासाठी धावपळीत होतो. Photo session चा कहर झाला होतो. (तिथल्या एकाने "press से हो क्या ??” सुद्धा विचारले J). सचिन मात्र त्याचे काम बघण्यात मग्न होतो. ( इथे सुद्धा त्याचा जो On the field focus असतो---- प्रकर्षाने जाणवत होता ) अंजली तेंडुलकरची कामाबद्दल जोरदार विचारपूस चालू होती .. सचिन देखील contractors, architects, consultant काय बोलत आहेत त्यावर आपली टिप्पणी देत होता.. जे आपण नेहमी ऐकतो calm , composed , down to earth ह्या सर्वांचा क्षणोक्षणी प्रत्यय येत होता ,कुठे हि बडेजाव पणा नाही, कुठेही दिखाऊ पणा नाही ..
     सुमारे एक तास कसा जळते कळलेच नाही ..सचिन आणि अंजली तेंडूलकर निघणार होते .. बास .. मी विचार केला हीच एक संधी आहे . आता घुसायचे आपण घुसायचे.. काय व्हायचे ते होऊ देत. मी पुढे गेलो आणि म्हणालो,” Sachin sir, Autograph please “.सचिन,” Yes sure “    
मला यशने ( यशोधन देशपांडे ) एक सचिनचे सुंदर sketch Birthday gift  दिले होते . ते मी सचिनच्या पुढे धरले. मी त्याच्याकडे  पाहण्यात दंग झालो होतो .सचिन,” छान काढले आहे !!!” ( यश या पेक्षा मोठे Compliment मिळू शकते का तुला ?) सचिन म्हणाला “ जरा खालून पकड“ ( IPL Semi final ला द्रविड चा Catch पकडताना  उजव्या हाताला झालेली Injury आठवली मला ) सचिन ने “ Best wishes” लिहून खाली autograph दिला.
     बाबा कडे Sachin Tendulkar Memorable ( Photobiography) by Peter Murray चे book होते. बाबांनी त्यावर autograph घेतला . विनय काकाने ( विनय फडणीस ) अरुण बेलसरे सर नि लिहिलेले Tendulkar-Gavaskar वर autograph घेतला. ( खर आज कै.बेलसरे सर पाहिजे होते त्याच्या lecture ला “सचिन” आणि “सुनील” बद्दल जी काही adjective वापरायचे ती आठवत होती.) बाबांच्या इतर सहकार्यांनी पण autographs घेतले.सचिन म्हणाला ,” मी नंतर तुम्हाला सगळ्यांना सह्या देतो परत येऊन जरा आता कामाचे बघू का ?” आम्ही त्याच्या समोर काय बोलणार ? आणि बोलण्याच्या परिस्थितीत तरी होतो का ? सचिन ने कामाची पाहणी केली आणि काही वेळातच निघून गेला.
     हा जो काही एक तास होता . तो वर्णन करायच्या पलीकडचा आहे. Unforgettable, Unbelievable Memorable!!! हा अनुभव जपाण्यासारखा होता. १४ मे २०१० कधीही विसरू शकत नाही मी .. ह्या माझ्या अनुभव चा शेवट आभारानेच करतो . बाबा, विनय काका , विश्वनाथ काका , सुनील काका , स्वाती ,मोहनीश ,सायली यांचे आभार .. Mclin Consultant चे शतकोटी आभार.. पण खरच हा अनुभव .. हि सचिन भेट म्हणजे ...
It’s Like Dream Come True!


Thursday, January 20, 2011

पदार्पण !


पदार्पण !!! 
माहित नाही .. पण मला "पदार्पणा"चे  भयानक आकर्षण आहे .. खरच !!!
पदार्पण म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची केलेली सुरवात वा प्रारंभ .. खरे तर अगदी साधीच गोष्ट आहे .. पण मला कसलंही पदार्पण असले की एक वेगळीच कुतुहुलता असते..
मग तो कुठल्याही गोष्टीच आसो .. क्रिकेट चा पहिला सामना असेल ... College मधला पहिला दिवस असेल.. 4 Wheeler शिकण्याचा असेल.. आहो एवढेच काय पहिल्या "घोटा" चा असेल... वेगळाच रोमांच असतो एक .
तो दिवस .. तो जो प्रसंग ..त्याची  एक वेगळी तयारी करतो .. कोणी म्हणाले च तर त्याला ठणकावून सांगतो " माझा आज पहिला दिवस आहे !!! ".. या सगळ्याचा आपण एक वेगळाच आनंद लुटलेला असतो.. आणि  प्रसंग आपल्या मनामध्ये कायमची एक  प्रकारची खुणगाठ बांधतो ...
म्हणूनच  "पदार्पणातील शतक " .. "पदार्पणात Filmfare".. यांना वेगळे महत्व प्राप्त होते .
खरे तर बऱ्याच वेळा पदार्पण हे लक्षात राहण्यासारखे होत ही नाही .. मग जरासे बिचकतच म्हणतो " अरे माझा आज पहिला"च" दिवस आहे न म्हणून असेल.. " 
पण तो एक असा क्षण असतो की जो तुमच्या पासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही..
पदार्पण हे तुम्ही आयुष्यभर जपून ठेवता .. आणि त्याला उजाळा देताना तुम्ही स्वतःला विसरून जाता हे मात्र नक्की .!!!.
ही विनंती : हे वाचल्या नंतर तुमच्या डोळ्यासमोर आलेले "पदार्पण" खाली नमूद करावे ..  !!
आगामी आकर्षण : Its like dream come true ..
--